जिल्ह्यातील तरुण तरुणींना संरक्षण दलात अधिकारी होण्यासाठी सुवर्ण संधी

सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे आणि शौर्य डिफेन्स अकादमी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने , राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA प्रवेशाचे मार्गदर्शन वर्ग सुरू होणार आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून , या प्रशिक्षण वर्गाचे औपचारिक उदघाटन २६ जानेवारी रोजी आभासी पद्धतीने झाले. प्रमुख पाहुणे म्हणून स्को. लिडर अक्षता भोळे आणि निवृत्त विंग कमांडर प्रकाश बापट उपस्थित होते. सरस्वती मंदिर ट्रस्ट चे कार्यकारी विश्वस्त श्री.सुरेन्द्र दिघे, शौर्य डिफेन्स अकादमीचे संस्थापक सौ. वैशाली म्हेत्रे आणि सुहास भोळे यांनी ठाणे परिसरातील तरुण तरुणींनी या उपक्रमाचा फायदा करून घेण्याचे आवाहन केले. इच्छुकांनी सरस्वती मंदिर ट्रस्ट ९१३७२९०४८६, वैशाली म्हेत्रे ९१३७७५६४३८ आणि सुहास भोळे यांच्याशी ९१३७३२०३४२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading