जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. पिंपरी, गोवेली, म्हारळ, भेरे, राया, ओझर्ली, चिंबीपाडा, कोन, खारबाव, पडघा, पाच्छापूर, अनगाव, दाभाड, वज्रेश्वरी, अंबाडी, असनोली, सरळगाव, धसई, टोकावडे, म्हसा, आटगाव, किन्हवली, सातगाव, गोठेघर, पिवळी, मोखवणे, शेणवे, अघई आणि डोळखांब येथील आठवडी बाजार बंद राहणार आहेत. याशिवाय अन्य ठिकाणी अनौपचारीक भरणारे छोट्या प्रमाणातील बाजार आणि त्यामुळं होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. हे आदेश न पाळणा-यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिका-यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading