जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंमध्ये घट

ठाणे जिल्ह्यात काल कोरोनाचे २८३ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ हजार १०९ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ९२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३२ हजार ५९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख ४२ हजार ९७ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ९६८ रूग्ण उपचार घेत असून ५२ हजार ८७३ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ३०२ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार २२ रूग्ण उपचार घेत असून ५५ हजार १०० बरे झाले तर १ हजार ९८ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ९२३ रूग्ण असून ४८ हजार ८२२ बरे झाले तर १ हजार ४५ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ३५५ रूग्ण उपचार घेत असून २४ हजार १९० कोरोनातून बरे झाले तर ७८२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३३० रूग्ण असून १० हजार ६३३ बरे झाले तर ३५८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ३५ रूग्ण उपचार घेत असून ६ हजार २०८ कोरोनातून बरे झाले तर ३५१ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १०६ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ८२९ बरे झाले तर ३०० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १५३ रूग्ण असून ८ हजार ५३३ कोरोनामुक्त झाले तर ११४ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २१७ रूग्ण असून १७ हजार ९३० बरे झाले तर ५७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading