जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोन केंद्रांवर उद्यापासून तिस-या टप्प्यातील लसीकरण

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दिवा अंजूर आणि शहापूर तालुक्यातील शेंद्रुण या दोन ठिकाणी तिस-या टप्प्यातील लसीकरणास उद्यापासून सुरूवात होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी मनिष रेंघे यांनी दिली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी हे लसीकरण सुरू होत असून फक्त ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांचेच लसीकरण होणार आहे. त्यामुळं इतर नोंदणी न केलेल्या नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी करून नये असं आवाहन करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत फक्त ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचंच लसीकरण होणार असल्यानं www.cowin.gov.in या वेबसाईटवर स्वत:ची माहिती रजिस्टर करावे. त्यानंतर लसीकरण निश्चित झाल्याचा संदेश आपल्या मोबाईलवर आल्यावर त्या दिवशी लसीकरण केंद्रावर ओळखपत्र घेऊन आलेल्यांचंच लसीकरण करण्यात येईल असंही जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading