जिल्हा वासियांच्या सेवेत नविन रुग्णवाहिका दाखल झाली असून या रूग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या वतीने अत्याधुनिक रुग्णवाहिका जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना आमदार किसन कोथोरे यांनी सुपुर्द केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार तसेच वरिष्ठ अधिकारी व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.