जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाचा राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्काराने सन्मान

ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाचा राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्काराने सन्मान झाला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला आणि बाल विकास विभाग, युनिसेफ, होप फॉर चिल्ड्रन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने 2023 पासून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे संपन्न झाला. महिला आणि बाल कल्याण विभागाला शासनाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा बाल स्नेही पुरस्काराचे वितरण महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे, यांच्या हस्ते करण्यात आले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला निधी आणि आयोगाच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असेही महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या. यावेळी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी ठाणे यांचा सत्कारकरण्यात आला. जिल्हयातंर्गत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक स्थापन करुन 155 मुलांना शाळेत दाखल करून त्यांचे पुर्नवसन करण्यात आले आहे. बाल संगोपन योजनातंर्गत 2 हजार 88 मुलांना लाभ देण्यात आला आहे. बालसंरक्षण, बालविवाह मुक्ती, बाल तस्करी रोख काम, बालकामगारांची कामातून मुक्तता, बालगृहातील सुधारणा, बालगृहामधील अपंग मुलांचे पुर्नवसन अशी उल्लेखनीय कामगिरी या कार्यालयाने बजावली आहे. त्यांनी केलेल्या या संपूर्ण कार्याची दखल महिला बालविकास आयुक्तालय, बाल हक्क संरक्षण आयोग व युनिसेफ सारख्या संस्थांनी आर्वजून दखल घेतली असून सदर कामकाज यशस्वीपणाने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे वरील सर्व कामे अत्यंत उत्कृष्टपणाने महिला बाल विकास अधिकारी कार्यालयास पाड पाडता आली. आयुक्त डॉ, प्रशांत नारनवरे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे विशेष अभिनंदन करुन सत्कार करण्याबाबत सूचित केले, अशी माहिती ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading