जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिका-यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिका-यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन काल करण्यात आलं होतं. यावेळी विविध सामाजिक विषयांवरील नृत्य, गायन, नाटिकांचे सादरीकरण करण्यात आलं. या सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकारी-कर्मचारी वर्ग मोठ्या उत्स्फुर्ततेनं सहभागी झाला होता. वैयक्तीक तसंच सामुहिक पध्दतीनं गायन, नृत्य तसंच नाटिका सादर झाल्या. या कलेच्या माध्यमातून सद्यस्थितीला समाजात घडणा-या घटनांवर प्रकाश टाकून जाणीवा जागृत केल्या. विविध पारंपरिक गीतांसह मराठी, हिंदी चित्रपटातील गाण्यांचा नजराणा सादर करण्यात आला. पाश्चिमात्य नृत्यासोबत आदिवासी, लावणी नृत्याचा जलवा यावेळी पहायला मिळाला. पोवाडा, भारूड, पारंपरिक गीतं, देशभक्तीपर गीतं आणि लघुनाटिकांमधून विनोदी पेरणी करत उपस्थितांचा ताण हलका करण्यात आला. याशिवाय बेटी बचाव, बेटी पढाओ, हिंगणघाट येथील घडलेली घटना आदी विषयांवर ज्वलंत नाटिका सादर करण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading