जिल्हाधिकार्यांकडून मिळाली सुमारे १० एकर जमिन ठाणे महानगरपालिकेला मोफत

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शिवाईनगर भागातील उपवन क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या डी.पी.नुसार उद्यानासाठी आरक्षित असलेली सुमारे ८ एकर तसेच रस्ता व इतर गोष्टींसाठी आरक्षित असलेली सुमारे २ एकर जमिन महसुल खात्याकडे असणारी ही आरक्षित जमिन जिल्हाधिकार्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करावी, यासाठी आमदार श्री. प्रताप सरनाईक पाठपुरावा करीत होते.

या प्रक्रियेला यश प्रप्त झाले असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी महसुल खात्याच्या नावावर असलेली जमिन ही ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये दिली आहे. त्यापैकी सुमारे २९२३६.३५ चौ.मी. जमिन बगीचा आरक्षण क्रं. ०६ करिता, सुमारे ३६५८.८२ चौ.मी. जमिन २० मी. रस्ता रूंदीकरणासाठी, सुमारे २५६५.६१ चौ.मी. जमिन ३० मी. रूंद एच.सी.एम.टी.आर. मार्गासाठी, सुमारे २०५९.२८ चौ.मी. जमिन पोखरण लेक इंडस्ट्री झोन ऐवजी बगीचा आरक्षण क्रं. ०६ करिता आरक्षित असलेल्या ह्या सर्व जमिनी ठाणे महानगरपालिकेच्या नावे झाल्यामुळे आता या परिसराचा महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास करणे सुलभ झाले आहे.या मोकळ्या जमिनीवर एका आदिवासी व्यक्तींने आपली जागा असल्याचे भासवून त्या ठिकाणी फुटबॉल टर्फ तसेच इतर व्यावसायिक काम चालू केले होते. तसेच स्थानिक खेळाडूंना तेथे क्रिकेट खेळण्यासाठी सुध्दा गुंडगिरी करून बंदी केली होती. त्यानंतर आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेऊन, सदर शासकिय जमिनीवर असलेले अतिक्रमण महानगरपालिकेच्या माध्यमातून काढून टाकून स्थानिक खेळाडूंना हे मैदान खेळण्यासाठी सुपुर्त केले होते.उपवन तलावाशेजारी गणपती मंदिराच्या बाजूला आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जिमखाना मंजूर केला आहे. त्याकरिता एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून ह्या आरक्षित भुखंडाला चारही बाजूंनी संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, रस्ता तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने निर्माण करण्यात येणार्या जिमखान्यासाठी ५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे उपवन तसेच शिवाईनगर येथील आजूबाजूच्या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading