जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तारपाधारी अर्धपुतळ्याच्या रंगरंगोटीला जिल्हा प्रशासनाची परवानगी

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तारपाधारी अर्धपुतळ्याच्या रंगरंगोटीला जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आदिवासी समाज बांधव मोठ्या श्रध्देनं या आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्याचं दरवर्षी पूजन करत असतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथे पारंपरिक पध्दतीने नाचगाणी करून या पुतळ्याचं पूजन केलं जातं. दसरा, जागतिक आदिवासी दिन, वसुबारस अशा दिवशी हे पूजन होतं. गेली काही वर्ष या अर्धपुतळ्याच्या रंगरंगोटीस परवानगी मिळावी म्हणून आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना प्रयत्न करत होती. त्याला आता जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading