जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

देशाच्या ७४व्या स्वातंत्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोरोना महामारीच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोविड योध्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ठाण्यातील पोलीस अधिकारी संजय धुमाळ यांचा यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच वयाच्या १०३व्या वर्षी कोरोनावर मात करून समाजासमोर एक उत्तम उदाहरण ठरलेल्या छाब्रिया यांनाही पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरीय रुग्ण व्यवस्थापन केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading