जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उद्या रानभाज्या प्रदर्शन आणि विक्री

रानभाज्या प्रदर्शन आणि विक्री  उद्या ११.०० ते ५.०० वाजता नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित केला आहे. हा कार्यक्रम ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व येऊर एन्वोरमेंटल सोसायटी यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे . जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचे रानभाज्यांचे नमुने प्रदर्शन आणि विक्री साठी ठेवण्यात येणार आहे. निसर्गातः उपलब्ध होणा-या रानभाज्या नैसर्गिक सेंद्रिय असून सर्व प्रकारची जीवनसत्वे, औषधी गुणधर्म संपन्न आहेत. आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्वाचे आहे या करता जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी हि संकल्पना अवलंबण्याचे महाराष्ट्र शासनाचे कृषि विभागाचे धोरण आहे. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या,हिरव्या भाज्या फळभाज्या, पावसाळ्याच्या सुरवातीला येतात आणि त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याचे दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवाना उत्पनाचे स्रोत निर्माण करणे या करिता रानभाज्या प्रदर्शन विक्री आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading