ठाणे वार्तातर्फे हरितालिका पूजा विधी उपलब्ध

ठाणे वार्तातर्फे यंदा हरितालिका पूजा विधी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात सध्या गुरूजी मिळणं कठीण होत आहे. याच पार्श्वभूमीवर यंदापासून हा नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आहे. अनेक स्त्रियांची हरितालिका पूजेसाठी गुरूजी मिळत नाहीत ही तक्रार लक्षात घेऊनच आम्ही यंदापासून हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षापासून श्रीगणेश पूजा आणि उत्तरपूजा या दोन्ही पूजांचं रेकॉर्डींग युट्यूब च्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत पोहचवत आहोतच. त्याला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मागणीनुसार आम्ही यावर्षीपासून हरितालिका पूजा विधी हा नवीन उपक्रमही नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.
ज्यांना हा पूजा विधी हवा असेल त्यांनी आम्हांला whats app वर 9987942222 या क्रमांकावर संपर्क साधून घेऊ शकता. हे तिन्ही पूजाविधी पूर्णत: विनामूल्य आहेत. फक्त आपल्या सूचना आमच्यापर्यंत पोचवा आम्ही त्यांचा स्वीकार करू.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading