जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागृती कार्यक्रम

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्येकाने राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर लॉगईन करून आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घ्यावी तसंच निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकनियुक्त सरकार स्थापन करण्यास प्रवृत्त करावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं. यावेळी व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. मतदार जागृती मंचाद्वारे सर्व सरकारी कार्यालयात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत निवडणूक आयोगानं निर्देश दिले असून त्यानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मतदान विषयक मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच निवडणूक आयोगाच्या माहिती पुस्तिकेच्या वितरणाचा शुभारंभही करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading