जिज्ञासा ट्रस्टतर्फे मुला-मुलींसाठी हिमालयन साहस शिबीर

गेल्या दोन वर्षाचा अपवाद वगळता, गेली अठ्ठावीस वर्षे, जिज्ञासा ट्रस्ट, 11 ते 16 वयोगटांतील मुला-मुलींसाठी हिमालयन साहस शिबीर आयोजित करते. यावर्षी 10 ते 18 मे दरम्यान हे शिबीर मनाली येथे संपन्न झाले. 10 मुले आणि 17 मुलीं या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. ट्रेकिंग, व्ह्याली क्रॉसिंग,अती थंड वेगवान हिमनदी प्रत्यक्ष ओलांडणे, रॅपलिंग, इत्यादी साहसी थरारक खेळांबरोबर, निसर्ग निरीक्षण, फोटोग्राफी,स्थानिक इतिहास आणि संस्कृती यांची ओळख , शिबिरार्थींना करून देण्यात आली. 14 हजार फुटावरील रोहतांग पासवरील बर्फात खेळणे आणि हिमवर्षावाचा रोमांचकारक अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. रोहतांग पास पलीकडील लाहुल खोऱ्याला भेट देऊन, अटल बोगद्यातून प्रवास विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव होता. सुमिता दिघे, मिलिंद व्हढावकर, आणि सुरेंन्द्र दिघे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading