जिंदाल कंपनी आग प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये १ जानेवारीला मोठ्या स्वरुपात आग लागली होती. ह्या घटनेमध्ये ३ कामगार महिमा सिंग, अंजली यादव, सुधीर मिश्रा हे मृत झाले होते. तर २२ कामगार जखमी झाले होते. अकस्मात जळीताच्या चौकशीचे अहवाल मागविण्यात आले होते. त्याचबरोबर कंपनीचे सेफ्टी ऑडीट रिपोर्ट आणि इतर कागदपत्रे प्राप्त करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, ज्या बॅच पॉली प्लॅन्टमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉली प्लॅन्ट हा सुमारे दिड महिन्यांपासुन बंद होता. हा प्लॅन्ट सुरु करण्यापुर्वी त्याची तपासणी आणि दुरुस्ती होवुन, तो सुरु करताना SOP चे पालन न केल्याने, प्लॅन्टमधून थर्मिक फ्लुईड ऑइलची गळती होवुन ही आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. या आगीत १ पुरुष आणि २ महिला कामगार यांचे मरणास आणि कंपनीचे इतर २२ कामगारांच्या दुखापतीस जिंदाल पॉली फिल्म प्रा. लि. कंपनीचे भोगवटादार, फॅक्टरी मॅनेजर, पॉली फिल्म प्लॅन्ट बिजनेस हेड, प्रोडक्शन मॅनेजर, मेन्टेन्सस विभाग प्रमुख, प्रोडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इंचार्ज आणि प्लॅन्ट ऑपरेटर या ७ व्यक्ती जबाबदार आहेत म्हणून त्यांच्याविरुध्द घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार घोटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading