जानेवारी, एप्रिल, जुलै, आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला आगावू मतदार नोंदणी करता येणार

आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै, आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, या विशेष मोहिमेंतर्गत आगावू मतदार नोंदणी करता येणार आहे.
मतदारांनी प्रारूप मतदारयादीतील आपले तपाशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे. या कालावधीत नवीन मतदार नोंदणी केलेल्या मतदारांची पडताळणी करणे कामी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे आपले घरी भेट देणार असून त्यांना योग्य ते कागदपत्र / पुरावे देऊन सहकार्य करावे. मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा NVSP, Voter Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहेत. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होवून अन्य गावात गेलेल्या विवाहित स्त्रियांच्या नावांची मतदारयादीतून वगळणी केली जाईल. मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदारयादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक जागरूक नागरिकाने १७ ऑक्टोबर रोजी प्रारूप स्वरुपातील मतदारयादीतील आपले तपशील अचूक आहेत का, याची खात्री करून घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading