जागतिक महिला दिनाचं औचित्य कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सिध्देश्वर तलाव परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका नंदिनी विचारे यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्यासाठी झटणा-या महिलांचा सत्कार केला. नंदिनी विचारे यांनी चैत्रगौरी महिला बचत गटाची निर्मिती करून अनेक गरजू महिलांना रिक्षा चालवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले. सिध्देश्वर तलाव परिसरातील गरीब आणि गरजू महिला आत्तापर्यंत कधी घराबाहेर पडल्या नव्हत्या. त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी हे प्रशिक्षण दिले आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने कमी व्याजानं रिक्षा उपलब्ध करून रोजगार उपलब्ध करून दिला. या निर्णयामुळे आज या परिसरातील गरीब, गरजू महिला आपले घर चालवण्यासाठी हातभार लावत आहेत. दुस-या टप्प्यात महापालिकेच्या तेजस्विनी बसेससाठी ७० वाहक तयार केले आहेत. लवकरच या महिला तेजस्विनी बसमध्ये रूजू होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान महापालिकेच्या महिला सफाई कामगारांचाही त्यांनी सन्मान केला. गोदाताई परूळेकर मैदानात आयोजित केलेल्या पाककला, संगीत खुर्ची, चमचा-लिंबू, टिकली-पावडर अशा विविध स्पर्धांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. यावेळी विजेत्या स्पर्धकांना एलईडी टीव्ही, सोन्याचं नाणं, ५ मोबाईल, सोन्याची नथ, पैठणी साडी अशी बक्षीसं प्रदान करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading