जागतिक पर्यावरण दिनी 200 झाडे लावण्याचा संकल्प

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आणि ठाणे महापालिका याच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 200 हुन अधिक झाडे लावण्यात आली. यामध्ये विविध झाडांचा समावेश करण्यात आला होता. पातलीपाडा येथे असलेल्या बॉटोनीक उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल आणि शहराची जैवविविधता राखण्यास मदत होईल. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे तसंच पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावले उचलणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू असल्याचे यावेळी वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी सांगितले. कोरोनाच्या या महामारीच्या दिवसात ऑक्सिजनसाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत असताना कृत्रिम ऑक्सिजन मिळावा यासाठी नियोजन करावे लागत आहे. जागतिक पर्यावरण दिन हा एकदिवस साजरा न करता प्रत्येक दिवशी पर्यावरण संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला पाहिजे असे मत यावेळी समिती सदस्यांनी मांडले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading