जागतिक पर्यावरण दिनी महापालिका क्षेत्रात 4200 रोपांची लागवड

जागतिक पर्यावरण दिनी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. महापालिकेच्या माध्यमातून एकूण 4200 रोपे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. वर्तकनगर प्रभाग समिती मधील प्रमोद महाजन निसर्ग उद्यान येथे 10 रोपे, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती येथील खेतले उद्यान येथे 10 रोपे, रोड नं. 22 रोडवरील सर्कल येथील रस्ता दुभाजकांमध्ये 10 रोपे लावण्यात आली. तर नौपाडा प्रभाग समिती मधील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 10 रोपे, ब्रह्माळा तलाव येथे 10 रोपांची लागवड करण्यात आली. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील पार्क वन, मोघरपाडा येथे 1000, कळवा प्रभाग समितीतील पारसिक वॉटर फ्रंट येथे 1000 तसेच कौसा स्टेडियम येथे 1000 रोपांची लागवड ग्रीन यात्रा संस्थेने सीएसआर निधीतूनअकिरा मियावाकी पध्दतीने केली. तर विविध निमशासकीय तसेच शासकीय कार्यालय, कलासंगुध मंडळ आदींना मोफत 150 रोपांचे वाटप करण्यात आले असून पर्यावरण दिनी एकूण 4200 रोपांची लागवड करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading