जांभळी नाका येथील होलसेल भाजीपाला मार्केट बंद – महापालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरु

ठाण्यातील जांभळी नाका येथील होलसेल भाजीपाला मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे पालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.
कोव्हीड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जांभळी नाका येथील होलसेल भाजीपाला मार्केट बंद करण्यात येत असून पालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरु करण्यात येत आहे. या होलसेल मार्केटच्या परिसरातील किरकोळ व्यापा-यांनी त्या ठिकाणी जाऊन भाजीपाला खरेदी करावयाचा आहे. त्या परिसरातील किरकोळ व्यापा-यांव्यतिरिक्त अन्य नागरिकांना या मार्केटमध्ये जाता येणार नाही. या ठिकाणी नियंत्रक अधिका-यांकडून होलसेल व्यापा-यांना ओळखपत्र पाहूनच बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
उथळसर प्रभाग समिती मध्ये साकेत पोलीस मैदान, अनिल जाधव मैदान, वृंदावन शेवटचा बसस्टॉप, मुंब्रा प्रभाग समितीमध्ये बाहुबली मैदान, जैन मंदिर मुंब्रा पोलीस स्टेशन समोर, मित्तल मैदान, दिवा प्रभाग समिती मध्ये दिवा महोत्सव मैदान, दिवा आगासन रोड, छत्रपती क्रीडा मैदान ,बीसयूपी जवळ, पडले गाव, वागळे प्रभाग समिती रामनगर पाण्याच्या टाकीजवळील मैदान, साईनाथ मंदिर मैदान, माजीवडा प्रभाग समितीमध्ये खेळाचे मैदान, ज्ञानगंगा कॉलेजजवळ, बोरीवडे आनंदनगर परिसर घोडबंदर, वाघबीळ टीजेएसबी समोरचे मैदान, कावेसर कॉसमॉस पार्कसमोर, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये भगवती शाळा मैदान शाहू मार्केटजवळ, वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये उन्नती मैदान, देवदयानगर रोड शिवाईनगर, निहारिया मैदान, घाणेकर नाट्यगृहजवळ, लोकमान्य नगर प्रभाग समिती मध्ये सचिन तेंडुलकर मैदान, महात्मा फुलेनगर, सावरकर नगरशाळा क्र. 120 मैदान आणि कळवा प्रभाग समितीमध्ये पारसिक रेतीबंदर मैदान, 90 फूट रस्ता खारेगाव,पारसिक नगर या ठिकाणी होलसेल मार्केटची व्यवस्था करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारे कायदेशीर कारवाईस पात्र राहतील तसंच सोशल डिस्टन्स पाळण्याची जबाबदारी दुकानदारावर राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading