जखमी गोविंदा प्रथमेश सावंत याला मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत

दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 22 वर्षांच्या गोविंदाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तीकरित्या पाच लाखांची मदत केली आहे. ही मदत शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी प्रथमेश सावंत याला सुपुर्द केली आणि शिवसेना त्याच्या पाठीशी असल्याचा दिलासा दिला. करीरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला असून मणक्याच्या पॅरेलिसीसला सामोरे जावे लागले. प्रथमेश सावंत हा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील के.ई. एम. रुग्णालयात उपचार घेत आहे. प्रथमेश सावंत याचे आईवडील नसून त्याचा सांभाळ नातेवाईक करीत आहे. त्याला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी वैयक्त‍िकरित्या पाच लाखांची मदत केली आहे. नरेश म्हस्के यांनी आज के.ई.एम. रुग्णालयात प्रथमेश सावंत याची भेट घेवून पाच लाखांची मदत सुपुर्द केली. सरकार त्याच्या पाठीशी आहेच, परंतु शिवसेना सदैव त्याच्या सोबत असल्याची ग्वाही त्याला नरेश म्हस्के यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading