छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना जलद सुविधा मिळाव्यात – अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कमीत कमी वेळेत उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले. निवासी डॉक्टरांच्या संख्या वाढविणे, संगणकीकृत व्यवस्था मार्गी लावणे याबाबत माळवी यांनी सूचना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा सविस्तर आढावा त्यांनी यावेळी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. त्या सर्व रुग्णांना तपासणी, चाचण्या करण्यासाठी विविध विभागांना जावे लागते.अशा वेळी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्णांची प्राथमिक तसेच आजाराबाबतची माहिती, जुने रिपोर्ट आदींची माहिती अवगत असल्यास उपचार करण्यास सोयीचे जाते. याकरिता प्रभावी पद्धत अंमलात आणून रुग्णाचा वेळ वाचण्यासाठी विभागाने आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीद्वारे संपूर्ण रुग्णांची माहिती संगणकीकृत करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार निवासी डॉक्टरांच्या संख्या वाढविणे, निवासी डॉक्टरांच्या पदोन्नती करणे, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, नर्सिंग स्टाफ आणि टेक्निशियन आदींच्या पदोन्नती करण्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यास संदीप माळवी यांनी संबधितांना सूचना केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading