चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उद्या चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने आकाशात दिसणार सुपरमून

उद्या २७ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने आकाशात सुपरमून दिसणार आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमेचे चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. महिन्यातून तो एकदा पृथ्वीजवळ येतो आणि एकदा दूर जातो. उद्या चंद्र पृथ्वीच्याजवळ ३ लक्ष ७३ हजार ३७९ किलोमीटर अंतरावर येणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीजवळ आल्यामुळे सुपरमून दिसणार आहे. उद्या रात्री ७ वाजून २३ मिनिटांनी चंद्र पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळेल. साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शन घेता येईल. यानंतर यावर्षी वैशाख पौर्णिमेच्या रात्री २६ मे रोजीही सुपरमून दिसणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading