चिपळूणच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेची ३ वैद्यकीय पथके रवाना

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने महापालिकेची ३ वैद्यकीय पथके आज चिपळूणला रवाना करण्यात आली. याप्रसंगी महापौर आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सर्व पथकाला शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्यावतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे १५० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके महाडला यापूर्वीच रवाना झाली आहेत. यासोबतच चिपळूणची पुरपरिस्थिती पाहता तिथेही मदतकार्यासाठी पथके पाठवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने महापालिकेच्या आरोग्य विभागाची ३ वैद्यकीय पथके आज रवाना करण्यात आलीत. ही पथके महापालिका महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि संजय हेरवाडे यांच्या समन्वयाने मदत कार्य करणार आहेत. यामध्ये कोविड, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी वैद्यकीय पथके पाठविण्यात आली आहेत. या पथकांसोबत रॅपीड अँटीजेन टेस्टींग कीटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टींग कीटस्, तीन डॅाक्टर्स, नर्सेस, वॅार्डबॅाय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading