चितळसर पोलीसांनी तब्बल १ कोटी ३८ लाखांचा ६९१ किलो ग्रॅम गांजा केला जप्त

चितळसर पोलीसांनी तब्बल १ कोटी ३८ लाखांचा ६९१ किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आज पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान गांजा भरलेला एक ट्रक माजिवडा नाका इथे येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक जितेंद्र राठोड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या पथकाला नाकाबंदी साठी रवाना केले. त्यानुसार तत्वज्ञान विद्यापीठ येथे उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता मक्याची कणसे आणि त्याखाली ताडपत्री खाली गांजा या अंमली पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावर मिळून आला. या तपासणीत १ कोटी ३८ लाखांचा ६९१ किलो गांजा आणि २५ लाखांचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक असा १ कोटी ६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी ट्रकवरील अज्ञात चालक आमि मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading