चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश

तौक्ते चक्रीवादळामुळे काल रात्रीपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आज प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे आदेश देत अतिवृष्टी कालावधीत सर्व यंत्रणांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे आदेश दिले. काल रात्रीपासून शहरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या वादळी पावसाळामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर लहान-मोठे वृक्ष पडल्याची घटना घडली असली तरी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सतर्कतेने आणि जलद प्रतिसादामुळे सर्व वृक्ष तात्काळ हटवण्यात आले असून संबंधित रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. अतिवृष्टीच्या या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी कक्षाकडे आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत अतिवृष्टी कालावधीत नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे आदेश देतानाच सर्व नाल्याची साफसफाई करणे, शहरात सखल भागात पाणी साठणार नाही, धोकादायक इमारती तसेच वृक्ष पडून जीवित आणि वित्तहानी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading