चंद्रपूर येथील राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुश्मिता देशमुखला रौप्य पदक

चंद्रपूर येथे झालेल्या सीनिअर राष्ट्रिय स्तरिय क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुश्मिता देशमुख हिने 52 किलो वजनी गटात पण स्वतःच वजन 47 किलो असूनही रौप्य पदक पटकावले, देशाच्या विविध राज्यातून 52 किलो वजनी गटामध्ये 23 खेळाडूंचा सहभाग होता. बेंच प्रेस या प्रकारात रौप्य पदक, डेटलिस्ट या प्रकारात सुद्धा रोप्य पदक आणि पूर्ण पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक त्याचप्रमाण दुसरी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू 2022-23 हा किताब पटकावला. सुश्मिता देशमुख ही पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करीत आहेत. मात्र या स्पर्धांना नॉमिनेशन मिळाल्यावर तेथे पोहोचण्यासाठी लागणारा खर्च तिच्या कुटुंबियांना पेलवत नाही. ठाण्यातील विटाव्यात राहत असलेल्या अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या या खेळाडूला आर्थिक पाठबळ मिळाले तर जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरून ती यश संपादन करू शकते. म्हणूनच तिला सहकार्य करण्याचे आवाहन तिचे पालक करीत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading