सकाळी चालायला बाहेर पडलेल्या व्यक्तीच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. घोडबंदर रस्त्यावरील पातलीपाडा येथे व्यायामासाठी सकाळी चालायला बाहेर पडलेल्या महेश पणीकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी हिसकावून पळ काढला. महेश पणीकर हे आपल्या नातलगासोबत सकाळी चालायला गेले होते. त्यावेळी मोटरसायकलवरून दोघेजण आले आणि मागे बसलेल्या चोराने पणीकर यांच्या गळ्यातील ४० ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून घेतली. याप्रकरणी कासारवडवली पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाने सामान्यांचं जीवन असह्य केलं असतानाच आता अशा चो-यांच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.