घोडबंदर रस्त्यावर तुर्फेपाडा येथे टँकरनं पादचा-याला चिरडल्याची घटना

घोडबंदर रस्त्यावर अपघातांचं सत्र सुरूच असून रविवारी पहाटे कॅडबरी सिग्नलजवळ दूधाच्या टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ताजी असतानाच रात्री घोडबंदर रस्त्यावर तुर्फेपाडा येथे दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टँकरनं पादचा-याला चिरडल्याची घटना घडली. यामध्ये हिरानंदानी इस्टेट येथे राहणा-या विलास पाईकराव यांचा मृत्यू झाला. पोलीसांनी टँकर चालक हिरेंद्रकुमार सिंग याला अटक केली. रात्रीच्या सुमारास पाईकराव पायी घरी निघाले होते. तेव्हा हिरानंदानी इस्टेट कडून तुर्फेपाडा येथे दुचाकीला ओव्हरटेक करून निघालेल्या टँकरच्या पुढील चाकाखाली येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading