घोडबंदर रस्त्यावर झाड इलेक्ट्रीक पोलवर पडल्याने काही वेळ वाहतूक कोंडी

घोडबंदर रस्त्यावर तत्वज्ञान विद्यापीठाजवळ ठाण्याकडे येणा-या रस्त्यावर एका कंटेनरने झाडाला धडक दिल्याने हे झाड महावितरणच्या पोलवर पडले. आज सकाळी ९ च्या सुमारास घोडबंदरकडून ठाण्याकडे एस जे ए लॉजिकल इंडिया लिमिटेडच्या कंटेनरने झाडाला धडक दिली. त्यामुळे हे झाड महावितरणच्या इलेक्ट्रीक पोलवर पडल्याने सकाळी १ तासभर वाहतूक कोंडी झाली होती. कापुरबावडी वाहतूक पोलिस कर्मचारी, वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी तात्काळ धाव घेऊन पडलेले झाड बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading