घोडबंदर रस्त्यावरील सूरज वॉटर पार्क जवळ महानगर गॅस पाईपलाईनला धक्का लागल्यामुळे या परिसरातील गॅसचा पुरवठा विस्कळीत

घोडबंदर रस्त्यावरील सूरज वॉटर पार्क जवळ महानगर गॅस पाईपलाईनला धक्का लागल्यामुळे या परिसरातील पाईप लाईन गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. दुपारच्या सुमारास सूरज वॉटर पार्कजवळील पंचामृत सोसायटीच्या समोर विद्युत वाहिनी टाकण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी जेसीबीचा धक्का गॅस वाहिनीला लागला आणि या परिसरातील पाईप लाईन गॅस ग्राहकांचा गॅस पुरवठा ठप्प झाला. महानगर गॅसच्या अधिका-यांनी त्वरीत धाव घेऊन हा गॅस पुरवठा बंद केला आणि दुरूस्तीचं काम सुरू केलं. आता परिस्थिती नियंत्रणात असून काही वेळातच पंचामृत सोसायटीतील ३०० ग्राहकांचा गॅस पुरवठा पूर्ववत होईल असं आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading