घोडबंदर मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे बुजवण्याच्या कामाची अधिकाऱ्यांच्या समवेत खासदारांनी केली पाहणी…


गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे घोडबंदर परिसरातील रस्त्यावरील खड्डे अधिक तीव्र झाल्याने गेले 5-6 दिवस या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने त्याचा फटका शहरातील वाहतूक कोंडी वर होत होता. शहरातून घोडबंदर येथे जाण्यासाठी एक ते दीड तास प्रवास नागरिकांना करावा लागत होता. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना गेले काही दिवस मनस्ताप सहन करावा लागत होता. खासदार राजन विचारे यांनी या होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ठाणे महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच पोलिस आयुक्त व वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त त्यांच्याशी सतत संपर्क साधून वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने आज विश्रांती घेतलेल्या पावसामुळे चेना ब्रिज पासून खड्डे बुजवण्याच्या सुरू झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली. खासदार राजन विचारे यांनी आज संवाद साधताना चेना ब्रीज ते कापूरबावडी या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून येत्या ३ दिवसांमध्ये ते पूर्ण करणार आहे अशी माहिती दिली. तसेच या मार्गावर जड अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून रात्री ११:०० ते सकाळी ५:०० वाजे पर्यंत जड वाहने काढण्याच्या अधिसूचना देण्याची विनंती करण्यात आली होती. त्याची आज पासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी आज दिली. या पाहणी दौऱ्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कांबळे, कार्यकारी अभियंता सचिन पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनय राठोड, पोलीस निरीक्षक परदेसी, नगरसेवक नरेश मनेरा, सिद्धार्थ ओवळेकर आदि उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading