घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महापालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता हिरानंदानी इस्टेट आणि ऋतू पार्क येथे उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळांना महापालिका आयुक्तांनी भेट देवून तेथील कार्यप्रणालीची बारकाईने पाहणी केली. शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी डायघर येथे प्रकल्प उभारणीसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून विकेंद्रित पद्धतीने ५-५ मेट्रिक टन क्षमतेचे प्रकल्प उभारून पहिल्या टप्प्यात १०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासकीय वित्तीय मान्यता घेवून हिरानंदानी इस्टेट येथे बायोकंपोस्टिंग २० मेट्रिक टन, मेकॅनिकल कंपोस्टिंग १० मेट्रिक टन आणि बायोमिथेल गॅस ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच ऋतू पार्क येथे १० मेट्रिक टन क्षमतेचा मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे. शहरातील विविध ठिकाणांहून दररोज ओला आणि सुका कचरा महापालिकेच्या हिरानंदानी इस्टेट आणि ऋतू पार्क या दोन प्रकल्पस्थळी आणला जात असून त्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाते. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु असून या प्रकल्पांची आज महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. या प्रकल्पस्थळावरील सर्व यंत्रणेची त्या-त्या जागी जाऊन पाहणी करून भविष्यातील प्रकल्पस्थळाच्या नियोजनाविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कचऱ्यांचे संकलन, वाहतुक आणि शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट प्रणाली व्यवस्थित राबविली जात असली तरी त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading