ग्लोबल कोविड रूग्णालयात रूग्णांची काळजी घेणाराच मोबाईल चोर

ठाण्यातील ग्लोबल कोविड रूग्णालयात रूग्णांची काळजी घेणाराच मोबाईल चोर असल्याचं निष्पन्न झालं आहे. कापुरबावडी पोलीसांनी याप्रकरणी गणेश मखवाना याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. गणेश मखवाना हा ग्लोबल रूग्णालयात रूग्ण काळजी वाहक म्हणून काम करतो. या रूग्णालयात दाखल असलेल्या महेंद्र पवार यांचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा मोबाईल न मिळाल्यानं त्यांच्या मुलाने कापुरबावडी पोलीसात तक्रार दाखल केली होती. त्यांनतर पोलीसांनी गणेश मखवानाला ताब्यात घेतलं. त्याच्या अधिक चौकशीत त्याने आणखी एक मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २१ हजारांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत मात्र मखवाना हा कोरोना रूग्णांच्या संपर्कात असल्यानं त्याला आत्ता फक्त नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading