ग्रामीण भागात १२ ते १४ वयोगटातील सुमारे २०० लाभार्थ्यांना लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज रात्री आठपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ८३८२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आजपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ ते १४ वर्षांच्या लाभार्थ्यांना लसीकरणास सुरुवात झाली असून दिवसभरात सुमारे २०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. मुरबाड तालुक्यातील सरळगाव आणि भिवंडी तालुक्यातील कोण येथे आज या लसीकरणास सुरुवात झाली. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २९ लाख ८६ हजार ६५३ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ५८ हजार ९१७ नागरिकांना तर ५९ लाख ७८ हजार ९५४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४८ हजार ७८२ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात २६८ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading