ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंचं प्रदर्शन

शहापूर-मुरबाडच्या आदिवासी ग्रामीण भागातील महिलांनी हस्तकलेतून निर्मित केलेल्या उबदार, नक्षीदार गोधड्या, दिवाळी साहित्य आणि इतर गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. पंचायत क्षेत्र विस्तार कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड या आदिवासी भागातील बचत गट आणि ग्रामस्थांनी तयार केलेले मोह फुलांचे लाडू, नाचणी सत्व, उबदार गोधड्या, मातीचे दिवे, खुरासनी चटणी, सॅनिटरी नॅपकीन्स, मध अशा विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचं जिल्हा परिषदेच्या आवारात आयोजन करण्यात आलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading