गुलमोहराचे झाड पडल्याने चारचाकीचे नुकसान

घोडबंदर रस्त्यावरील ग्रीन वूड कॉम्प्लेक्सजवळ एका चारचाकी गाडीवर दोन गुलमोहराची झाडे पडल्याने गाडीचे नुकसान झाले. तत्वज्ञान विद्यापीठाजवळील रस्त्यावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. आर के ट्रेनिंग स्कूलची ही होंडा एॅक्सेंट कार रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्यावेळी गाडीवर दोन गुलमोहराची झाडे पडली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वृक्षप्रधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान इमरजेन्सी वाहनासह घटनास्थळी पोहचले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, कोणालाही दुखापत नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी कर्मचारी, वृक्षप्रधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने गाडीवरती पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading