गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आला आहे. महापालिका आयुक्तांनी काल सकाळी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली होती आणि हे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर दुपारपासून खड्डे बुजवण्याच्या कामास वेग आला. तीन हात नाका फ्लायओव्हर, नितीन कंपनी, एम्को कंपनी, माजिवडा नाका, कशिश पार्क अशा विविध ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आलं. खड्डे दुरूस्त करण्याच्या कामात हयगय झाल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading