गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण शिवनेरी येथे संपन्न

गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण शिवनेरी येथे झालं.
नगरसेविका रुचिता मोरे आणि राजेश मोरे यांनी दिवाळी निमित्त गडे किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध इतिहास मुलांना समजावा याकरिता दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेचे यंदाचे हे १२ वे वर्ष होते. यंदाही दिवाळीच्या सुट्टीत प्रभागातील अनेक मुलांनी आणि मंडळांनी एकत्र येत किल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे परिक्षण प्रसिद्ध इतिहास अभ्यासक शिल्पा परब आणि त्यांच्या चमूने केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ किल्ले शिवनेरी येथे झाला. प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ उत्कृष्ट बांधणी आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, ऐतिहासिक पुस्तक आणी मानाची पगडी देऊन सन्मानित करण्यात आले. मुलांनी गड किल्ल्यांचा समृद्ध इतिहास आणि ऐतिहासिक परंपरा जपली पाहिजे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गड किल्ल्यांना भेटी देऊन इतिहास जास्तीत जास्त शिवप्रेमींपर्यंत पोचवला पाहिजे असे मत शिल्पा परब यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading