आपदा मित्र प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी गिरवले आगीवर नियंत्रण मिळवण्याचे धडे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आपदा मित्रांच्या पहिल्या तुकडीतील राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आगीवर नियंत्रण कसे मिळवावे तसेच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय करावे, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्ह्यातून 500 आपदा मित्र तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपदा मित्र प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या तुकडीचे 12 दिवसांचे प्रशिक्षण ठाण्यातील व्ही.पीएम.केजी. जोशी कला महाविद्यालय आणि एन.जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालयात सुरु आहेत. हे प्रशिक्षण निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयातील राष्ट्रीय कॅडेट कोअर (एन.सी.सी) आर्मी गर्ल्स, एन.सी.सी नेव्हल युनिट, राष्ट्रीय सेवा योजना व आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यपन करणारे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आहे. यावेळी आपदा मित्र प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख ओमकार वैती यांनी सांगितलं की, आग शांत करण्यासाठी सर्वसाधारणपणे पाण्याचा वापर केला जातो.कारण पाण्यामध्ये उष्णता शोषून घेण्याची सर्वाधिक क्षमता असते.लाकूड,पालापाचोळा, कापूस,कापड, कोळसा अशा घन पदार्थासाठी आग विझविण्यासाठी पाणी हे सर्वोत्तम माध्यम आहे. पाण्याची घनता जास्त असल्याने पेटलेला द्रव इंधन पदार्थ पाण्यावर तरंगतो आणि पाण्याबरोबर वाहून आग पसरण्याची शक्यता वाढते तसेच भडका होण्याचाही संभव असतो.त्यामुळे पट्रोल,डिझेल,या आगी पाण्याने विझवू नये.त्यासाठी वाळूचा किंवा अग्नीरोधक यंत्राचा वापर करावा. आपदा मित्रांना आपत्ती जन परिस्थती आढळून आल्यास आपत्कालीन वापरासाठी जवळच्या धोकादायक उद्योग,अग्निशमन केंद्र,पोलीस स्टेशन,नियंत्रण कक्ष आरोग्य सेवा आणि जिल्हा नियंत्रण कक्ष यांचे संपर्क क्रमांक आपल्या जवळ ठेवावे. तसेच आपला बचाव करुन आग कशी विझवावी यांची माहिती सांगितली. यावेळी आपदा प्रशिक्षणार्थींना गर्दीवर नियंत्रण कशा प्रकारे मिळवावे.जमाव कशा प्रकारे पांगवावा.दंगलीच्या वेळी आपला बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिक करुन घेतले. आपत्तीनंतर लवकरात लवकर स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आपदा मित्र उपयुक्त ठरणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading