खोपट एसटी स्थानक मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन ई-बसेसचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खोपट एसटी स्थानकाची अचानक जाऊन पाहणी केली..यावेळी त्यांनी एसटी स्थनाकातील स्वच्छतागृह आणि एसटी कर्मचाऱ्यांची विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी ही स्वच्छतागृह पुरेशी स्वच्छ नसल्याचे तसेच विश्रांतीगृहात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी तत्काळ त्यात बदल करण्याचे तसेच कर्मचाऱ्याना अंघोळीला गरम पाणी मिळावे यासाठी गिझर, पिण्यासाठी गार पाणी मिळावे यासाठी कुलर तसेच स्वच्छ स्वच्छतागृह तयार करावे असे सांगितले. तसेच ठाणे येथील खोपट एसटी स्थानक मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे असे निर्देश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ. माधव सुपेकर यांना दिले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading