खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा अशोक शिंगारे

जिल्ह्याची परंपरा आहे की, येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काढले. क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील मार्गदर्शक आणि खेळाडूंचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शिनगारे पुढे म्हणाले की, खेळाडू घडताना त्या खेळाडूच्या जिद्दीसोबत त्याच्या पालकांचा पाठिंबा आणि शासनाचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच खेळाडूंना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे, ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे, असे मी मानतो. जिल्ह्यातील भावी खेळाडूंना शासकीय सुविधांची जोड मिळाल्यास आणखी प्रतिभावंत खेळाडू निर्माण होतील आणि यासाठी सर्व प्रकारची मदत जिल्हा प्रशासनाकडून निश्चित केली जाईल.या .. जीवनगौरव पुरस्कार- बॅडमिंटन- श्रीकांत वाड, क्रीडा मार्गदर्शक- कबड्डी- प्रशांत चव्हाण, पॉवर लिफ्टिंग- नाजूका घारे, शुटिंग- भक्ती खामकर, कबड्डी- सायली जाधव, कबड्डी- निलेश साळुंके, खो-खो- प्रियांका भोपी, टेबल टेनिस- सिद्धेश पांडे, पॉवर लिफ्टिंग- साहिल उतेकर, मैदानी खेळ- प्रणव देसाई या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला,

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading