खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वन विभागातील कर्मचा-यांचं आंदोलन

मुख्य वन संरक्षकांवर शाई आणि राख फेकणा-या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी वन विभागातील कर्मचा-यांनी आंदोलन केलं. अंबरनाथमधील मांगरूळ गावात वृक्षारोपण केलेल्या झाडांना आग लागल्या प्रकरणात काही कारवाई न झाल्यामुळं संतप्त झालेल्या खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेच्या पदाधिका-यांनी सोमवारी वन विभागाच्या कार्यालयात आंदोलन केलं. यावेळी मुख्य वन संरक्षक राजेंद्र कदम यांच्या अंगावर जळलेल्या झाडांची राख आणि शाई फेकण्यात आली होती. वन विभागाच्या कर्मचा-यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आंदोलन केलं. पोलीस हल्ला करणा-यांना पाठीशी घालत असल्याचा कर्मचा-यांचा आरोप होता. या कर्मचा-यांनी हाताला काळ्या पट्ट्या लावून हे आंदोलन केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह हल्ला करणा-या पदाधिका-यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ३५३ नुसार कारवाई करावी अशी या कर्मचा-यांची मागणी होती. याप्रकरणी कडक चौकशी करून कारवाई करावी अन्यथा बंदचा इशारा पोलीस उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात वन विभागाच्या कर्मचा-यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading