कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास २७ नोव्हेंबर पासून राज्यभर काम बंद आंदोलन

राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे प्रलंबित देयके तातडीने द्यावी आणि इतर अनेक अडचणी तातडीने सोडवावी. अन्यथा सोमवार २७ नोव्हेंबर पासून राज्यभर सर्व विभागाकडील काम बंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिला. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास जलसंपदा सर्व विभागाचे विकासाचे कामे करणारे कंत्राटदार हे राज्यातीलच विकासाची कामे करूनच अडचणीत आले आहे. यावर वारंवार संघटनेने शासनाच्या निर्दनास स्मरणपत्रे द्वारे आणले असताना त्यांच्याकडून या गंभीर विषयांबाबत काहीही उपाययोजना केली जात नाही. मुख्यमंत्री यांनी कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यातील कंत्राटदार या सर्व विभागाची चालू असलेली आणि निविदा प्रक्रियेमध्ये असलेली विकासाची कामे सोमवार २७ नोव्हेंबर पासुन कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात हजारो कंत्राटदार रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्याची कामे, विद्युत विभागाची कामे बंद करण्यात येतील असे आवळे यांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading