कोवीड काळात कर्तव्य बजावलेल्या शासकीय कर्मचारी भगिनींसाठीचा भाऊबीज उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री शंभूराज देसाई

कोवीड काळात अहोरात्र कर्तव्य बजावलेल्या आरोग्य, पोलीस आणि महसूल प्रशासनातील महिला भगिनींचा भाऊबीज देऊन गौरव करण्याचा जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिजाऊ संस्थेच्या वतीने शहरातील पोलीस, आरोग्य, महसूल विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा भाऊबीज कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दोन वर्षापासून कोवीडचा संसर्ग आला होता. त्याकाळात आरोग्य, पोलीस आणि महसूल विभागातील पुरुष अधिकारी/कर्मचाऱ्यांबरोबर महिला अधिकारी/कर्मचाऱ्यांनी काळ-वेळ न पाहता अहोरात्र सेवा केली. त्यांनी केलेल्या कामांमुळेच कोवीडचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली. अशा महिला भगिनींना एकत्र आणून त्यांचा भाऊबीज देऊन संस्थेने योग्य गौरव केला आहे. कचरा वेचक मुलांसारख्या वंचित घटकांना प्रवाहात आणण्याचे काम जिजाऊ संस्था करत आहे. संस्थेतील अंध अपंग विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी सहकार्य करू असेही देसाई यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading