कोलशेत ग्रामस्थांना अधिकृत घरांच्या पाणी देयकावरील झोपडपट्टी हा शिक्का काढून टाकण्यात यश

ठाण्यातील कोलशेत ग्रामस्थांनी अधिकृत घरांना येणा-या पाणी देयकावरील झोपडपट्टी हा शिक्का काढून टाकण्यात यश मिळवलं आहे. गावठाण कोळीवाडे येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या आणि रहिवाशांच्या राहत्या अधिकृत घरावर २०१६-२०१७ पर्यंत कोणताही ठपका नव्हता. तेव्हा त्यांना १३० रूपये पाण्याचं बील येत असे. पण २०१७ नंतर अधिकृत घरावर स्लम हा ठपका लावून या लोकांना १३० रूपये पाण्याचं बील येण्यास सुरूवात झाली. ठाणे महापालिकेतर्फे झोपडपट्टी आणि इमारत यासाठी वेगळे पाणी दर आहेत. झोपडपट्टीसाठी १३० रूपये तर इमारतींकरिता २१० रूपये प्रति महिना पाणी बील आकारलं जातं. कोळीवाडा गावठाणमधील स्थानिक भूमिपुत्रांनी झोपडपट्टी शिक्का लावून आलेलं देयक भरलं तर ते कायद्याने झोपडपट्टी असल्याचं मान्य करतात आणि देयक न भरल्यास कायद्याने दोषी ठरतात. अशा द्विधा मनस्थितीत कोलशेत कोळीवाडा गावठाण मधील भूमिपुत्रांनी याविरोधात लढा दिला. महापालिका अधिका-यांना ही बाब लक्षात आणून देऊनही टोलवाटोलवी सुरू होती. यावर जनजागृती करण्यासाठी सर्व गावठाण कोळीवाडे यांनी जनजागृती सभा घेतल्या आणि आपापल्या परीने स्लम हा शिक्का येऊ नये यासाठी प्रयत्न केला. यामध्ये कोलशेत ग्रामस्थ कोलशेत गाव उत्कर्ष सामाजिक संस्थेनं यश मिळवलं असून महापालिकेच्या अधिका-यांनी यापुढे अशी देयकं दिली जाणार नाहीत असं आश्वासन त्यांना दिलं आहे. त्यामुळं त्यांच्या लढ्याला यश मिळालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading