कोलशेत खाड़ी किनाऱ्यावर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनकडून मॉकड्रील

कोलशेत खाडीचे पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे कोलशेत खाड़ी किनाऱ्यावर आणि खाडीत पूरपरिस्थितीमुळे काही दुर्घटना घडली तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी असावी म्हणून ठाणे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, कापुरबावडी पोलिस, अग्निशमन दल यांच्यावतीने मॉकड्रिल घेण्यात आले. कोलशेत खाडी किनाऱ्यावर हे मॉकड्रिल पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या मॉकड्रीलमध्ये पावसाळ्यात पुर परिस्थिती निर्माण झाल्याने आणि खाडीमध्ये 1 मच्छिमार बोट उलटून त्यामध्ये ७ ते ८ व्यक्ती खाडी डुबतात आणि त्यांना वाचविण्यासाठी आवश्यक ती तयारी कशी असावी याचा सराव करण्यात आले. या मॉकड्रिलसाठी कापुरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे, क्राइम पीआय संदीप धांडे, एनडीआरएफचे सावंत, अग्निशम दलाचे प्रमोद काकलजी, ठाणे महापालिकेचे अधिकारी महेंद्र भोईर, ठाणे आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी आणि कर्मचारी, रुग्णवाहिका, टीडीआरएफ, आरडीएमसी, अग्निशमन दल, कापूरबावडी पोलीस ठाण्यातील 2 अधिकारी 12 अंमलदार आणि स्थनिक पोलीस मित्र 25 अशी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading