कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानकातही प्रवाशांची कोरोना तपासणी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानकातही प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात असून त्याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेच्या वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून कोरोना तपासणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात थर्मल यंत्राद्वारे प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासलं जात आहे. आत्तापर्यंत तरी एकही प्रवासी संशयित आढळला नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून रोज ७ लाख प्रवासी ये-जा करतात. या रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन ७८२ गाड्या ठाणे, वाशी, पनवेल या हार्बर मार्गावर २८२ गाड्या धावत असतात. त्यामुळं ठाणे रेल्वे स्थानक नेहमीच गजबजलेले असते. आता कोरोनामुळे ठाणे स्थानकातील वर्दळ काही अंशी कमी झाली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या चार दिवसापासून फलाट क्रमांक २ जवळ प्रवाशांची थर्मल यंत्राद्वारे तपासणी केली जात आहे. अनेक प्रवासी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करून घेत असल्याचं दिसत आहे. दिवसभरात १० हजाराहून अधिक प्रवाशांनी या कक्षात तपासणी करून घेतल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading