कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिवहन सेवेच्या कार्यशाळेतून मार्गस्थ होणा-या बसेसचं निर्जंतुकीकरण

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिवहन सेवेच्या कार्यशाळेतून मार्गस्थ होणा-या बसेस निर्जंतुकीकरण करूनच बाहेर काढल्या जात आहेत. शासनानं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. परिवहन सेवेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सातत्यानं लोकांच्या संपर्कात येत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं कामावर असताना त्यांनी नाक तोंड झाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साबण आणि पाण्याने हात धुणे, ज्या कर्म-यांना सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी परिवहन सेवेकडून कर्मचा-यांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप महापौरांच्या हस्ते करण्यात आलं. परिवहन सेवेतील बायोमेट्रीक हजेरी प्रक्रियाही बंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading