कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पब, डिस्को, ऑर्केस्ट्रा आणि डान्सबार वरही बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी हे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी होणारे मालिकांचे, जाहिरातींचे तसंच चित्रपटांचे चित्रीकरण ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचं पालन न करणा-यांविरोधात सक्त कारवाईचा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला आहे.